RRB Isolated Bharti 2026: भारतीय रेल्वेत 311 जागांसाठी भरती

RRB Isolated Bharti 2026: भारतीय रेल्वेत 311 जागांसाठी मोठी भरती

रेल्वे नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे भरती मंडळ (RRB) मार्फत Isolated & Ministerial Categories Recruitment 2026 अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 311 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये शिक्षण, कायदा, लॅब, अनुवाद, प्रचार, कल्याण अधिकारी यांसारख्या विशेष (Isolated) विभागातील पदांचा समावेश आहे.

ही भरती संपूर्ण भारतातील पात्र उमेदवारांसाठी असून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. रेल्वेमध्ये स्थिर, प्रतिष्ठित आणि दीर्घकालीन करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

भरतीचा संक्षिप्त आढावा

  • भरतीचे नाव: RRB Isolated Categories Bharti 2026
  • भरती संस्था: Railway Recruitment Board (RRB)
  • एकूण पदसंख्या: 311 जागा
  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
  • अर्ज पद्धत: ऑनलाइन
  • नोकरी प्रकार: केंद्र सरकारी नोकरी
पोस्ट dateलास्ट date
26 डिसेंबर 202526 डिसेंबर 2025

RRB Isolated Bharti 2026

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर15
2लॅब असिस्टंट ग्रेड III (Chemist & Metallurgist)39
3चीफ लॉ असिस्टंट22
4ज्युनियर ट्रांसलेटर / हिंदी202
5स्टाफ अ‍ॅण्ड वेल्फेअर इन्स्पेक्टर24
6पब्लिक प्रॉसिक्यूटर07
7सायंटिफिक असिस्टंट (Training)02
एकूण जागा311
  1. पद क्र.1: (i) पदवीधर  (ii) डिप्लोमा (Public Relations / Advertising /Journalism / Mass Communication)
  2. पद क्र.2: 12वी (Physics and Chemistry) उत्तीर्ण
  3. पद क्र.3: विधी पदवी
  4. पद क्र.4: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी  (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) पदवीधर  (ii) डिप्लोमा (Labour/ Social Welfare/ Labour Laws) किंवा LLB किंवा PG डिप्लोमा (Personnel Management) किंवा MBA (Personnel Management)
  6. पद क्र.6: (i) विधी पदवी  (ii) पाच वर्षांचा वकिली अनुभव.
  7. पद क्र.7: (i) मानसशास्त्रात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी.  (ii) मानसशास्त्रीय चाचण्यांच्या व्यवस्थापनात एक वर्षाचा अनुभव.

 01 जानेवारी 2026 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1: 18 ते 33 वर्षे
  • पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
  • पद क्र.3: 18 ते 40 वर्षे
  • पद क्र.4: 18 ते 33 वर्षे
  • पद क्र.5: 18 ते 33 वर्षे
  • पद क्र.6: 18 ते 32 वर्षे
  • पद क्र.7: 18 ते 35 वर्षे
  • General / OBC: ₹500/-
  • SC / ST / महिला / दिव्यांग: ₹250/-

📌 CBT परीक्षेला उपस्थित राहिल्यानंतर काही प्रमाणात फी परत केली जाईल.

निवड प्रक्रिया (Selection Process)

RRB Isolated Bharti 2026 साठी निवड प्रक्रिया खालील टप्प्यांमध्ये होणार आहे:

  1. Computer Based Test (CBT)
  2. Skill Test / Typing Test / Translation Test (पदानुसार)
  3. Document Verification
  4. Medical Examination

👉 सर्व टप्पे उत्तीर्ण झाल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी (Merit List) जाहीर केली जाईल

RRB Isolated Bharti 2026 ही विशेष पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. जर तुम्ही अनुवाद, कायदा, विज्ञान, पत्रकारिता किंवा कल्याण क्षेत्रात शिक्षण घेतले असेल, तर ही भरती तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. अर्जाची अंतिम तारीख चुकवू नका आणि तयारीला आताच सुरुवात करा.

Leave a Comment